पानगळ

तू नसताना
लागते पानगळ
मनाच्या सागवनाला.
पाचोळ्याचा आवाज
दऱ्यादऱ्यांमधून
घुमतो
केविलवाणा!

झळा उन्हाच्या
करपवत जातात
उरलासुरला चारा.
विचारांची गुरंढोरं
दुष्काळ नसून
असल्यासारखी!

पायवाटा झाकलेल्या
बोडके डोंगर
पिवळसर धरती.
झरे आटलेले
हळद्याच्या गाण्यात
माझेच स्वगत!

तळपत्या उन्हात
वणवा पेटतो एखादा
भस्मसात क्षणात!
तू नसताना
नाही थंड वारा
फुलांच्या गारा!

तू नसताना
पळस उगाच फुललेली
सावर लालेलाल!
तू नसताना
शुष्क ओढ्याकाठी
रातवी पौर्णिमा!

तू नसताना
लागते पानगळ
मनाच्या सागवनाला
ये ना अशी इकडे
ऋतूबदल
अधीर मनाला!
– पंकज (०८.०३.२०१८)

पाखरे

तुझ्या
गंधाळलेल्या शब्दांची पाखरे,
आज कोवळ्या ऊन्हात तारेवर बसलेली.
काही
जुनी, कधी पाहिलेली आणि चारेक नवी दिसली.
काळीपिवळीनिळीहिरवीलालगुलाबी
गुबगुबीतझोपाळलेलीस्वप्नाळलेलीटकमक
चिवचिवाटांत
त्यांच्या, मनाचा गुंता, जुनानवासा!
त्यातलीच
उडाली काही, घरटं बांधायला पसार झाली.
काही
आपसूकच आली जवळ, चोचीत चोच
घालू लागली.
काही
उरली शून्यात, मग माझ्याकडे पाहत राहिली.
काय
करावे उरलेल्यांचे, कोवळ्या ऊन्हात चकाकला प्रश्न.
दगड
मारावा, उडवून लावावे, की दाणे टाकावे; बोलवावे इथे?
कसलं
काय करतेस वेडे, उघडला मनाचा पिंजरा नि गेले आत सारे!
                                                           

                                                            –
पंकज (२६ डिसेंबर २०१७)

तिशीचे तत्त्वज्ञान

मागच्या काही दिवसांपासून मी माझ्या आयुष्याबद्ल, वयाबद्दल, जगण्याच्या
पद्धतीबद्दल
, चुकांबद्दल, आणि एवढ्या वर्षांत
पक्व झालेल्या विचारांबद्दल विचार करतोय
. याला निमित्त एकच आहे ते म्हणजे मी नावाच्या या पोरकट कथेला आज तीस वर्षं पुर्ण होत आहेत. तीस वर्षं! केवढा हा काळ! कदाचित
आज मी जे लिहीतोय ते कित्येकांना त्यांच्या
त्यांच्या तिशीत वाटलं
असेल
नसेल; काहींना प्रकर्षानं जाणवलं असेल;
काहींनी शब्दबध्दही केलं असेल. मला माहितीय त्यांचं शेवटचं वाक्य असेलसरतेशेवटी

आपणच
आपल्या
आयुष्यात
मुर्ख
ठरलो!

येणारे येत
गेले, गाणारे गात गेले, जाणारे जात राहिले. आपण वर्णभेद केला, जातीभेद केला, धर्मभेद केला; देवापुढे टाळ्या वाजवल्या, नाचगाणी
केली, ठिकठिकाणी
डोकं टेकवलं; जोरजोरात फटाके फोडले, मुर्खागत सण साजरे केले; लाळघोटेपणा केला, छेडछाड केली, नसली तरी विकृत विचारांनी शरीरांना स्पर्शलंउपभोगलं; स्त्रीवादाच्या
गर्जना केल्या; शाळेत, कॉलेजात, मनात राजकारण खेळलो; आणि बरंच काही छोटंमोठं जे
जगाच्या डोळ्यांत, आज, माझ्या स्वत:च्या डोळ्यांत खुपलं असतं असं बरंचबरंच सारं
काही केलं. छोट्यामोठ्या चोऱ्या
केल्या, अधनंमधनं फसवाफसवी केली, आणि असं बरंच काही. हो केलं हे सगळं! मान्य आहे. हे ही
केलं! सगळंसगळं मान्यही
केलं! पुढे हे घडेल की नाही याची स्वत:ला हमी
देण्याची हिम्मत तेवढी होत नाही. कशी होईल? जगाच्या चक्रात एक नाहीतर दोनतीन
गोष्टी होतीलच हातून, वाटत राहतं. आपण आपल्या आयुष्याच्या सोयीस्कर फाका करून घेतल्या. मनात ठरवलेल्या वेळेच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत पोहोचेपर्यंत दमछाक केली नि हातपाय
कसेबसे ताणत त्यात्या रेषा
स्पर्शल्या. ‘केलं हे एकदाचंअशा आवेशात उभे राहिलो तेव्हा सारं जग गालांत हसताना दिसलं. मग आपणही हसत वेळ मारून नेली नि मनावर चाकूने एकेक रेघोटी ओढत गेलोच! मनावरच्या रेघोट्या शरीरावर ठिकठिकाणी उमटल्या नि त्यावर मग आपण आयुर्वेदीक औषधांचे लेप लावत गेलो. ते लेप लावणारे हातही बदलत राहिले एवढी वर्षं, जखमा अजूनही पोरक्या. वेळेप्रमाणे, वयाप्रमाणे गृहस्थाश्रमाकडे पावलं वळवली, पण वानप्रस्थाच्या वाटा खुणावत राहिल्या. कधी थांबून मागे वळून पाहिलं तर ती एक ओळखीची परतीची वाटही खुणावत राहिली. पाय उलटे वळवले तर पडून शरीराचा पाचोळा होणार हे ही जाणवलं जेव्हा पळायचा आव आणला; आयुष्याला नाही म्हटलं तरी गती असते याची जाणीव पदोपदी होत राहिली.
       

आता मागे
वळून बघताना, निदान थोडेथोडेके जे
निबंध, पत्रं, संदेश, मेल्स
इत्यादींचा पसारा उचकल्यास दिसतात या सर्व गोष्टींचे तुकडे. उरल्यासुरल्या, अर्धमेल्या, केविलवाण्या प्रेमाचे तुकडे लाकडाच्या शेकोटीपुढे उडणाऱ्या काळ्या कपट्यांसारखे आणि अशा थंडीतही तिचे गुलाबी ऊबदार हात माझ्या केसांमधे फिरणारे! मन खिन्न होऊन जातं. हे सर्व काही केलं आणि आज या सर्वं आठवणींचं ओझं घेऊन जगायची शिक्षाही मिळतीय. हे जाणवून अजूनच दु:. जगानं त्याच्यात्याच्या तत्त्वज्ञानानं
आपल्याला वेड्यात काढलं. आपल्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे आपल्या आयुष्याची थोड्याफार फरकाने वाट लावली. जिथे थोडी लावली ती भेग आपण मजा म्हणून फाकवत गेलो नि आता पडलेल्या भगदाडातून एक पाय तिकडे, एक इकडे अशी अवघडल्यासारखी अवस्था करून बसलोय.

आपण किती
मनं दुखवली, किती थोडक्यांना आपण सुख देऊ शकलो? दु:खाचं
पारडं जडच होतं दरवेळेस. एका व्यक्तीला सुख दिलं की दुसरी दुखावते आणि आपल्या मनाचा पावा आपणच वाजवत फिरतो गल्लीभर. त्यातून रडक्या मनाचे सूरही इतके मधुर की कळतंच नाही कुणाला की याला जखम झालीय खोलवर. वाजतोय पावा गोड, हसतंय जग, रडतंय मन! मग किती
मनं दुखावली? एक स्वत:चं आणि
अनेकशी दुसऱ्यांची! या सर्व गोष्टींमध्ये किती वर्षं वाया घालवली, किती घालवणार पुढे? भगदाडात पाय एक पाय इकडेतिकडे, हातात
पावा, मनात जखम, मेंदूत गोंधळ! या सर्वांत पैसा आला परत

जेव्हा कळलं
की पैसाच सर्वश्रेष्ठ तेव्हा आयुष्याची गणितं एका चुटकीत बदलून गेली! तेव्हा शिक्षणाचा अर्थ बदलला, जगण्याचं समीकरण बदलंल! मध्यमवर्गीय प्रवाहात
एका झटक्यात कुणीतरी उचलून फेकून दिलं आणि तेव्हापासून उलटं पोहून पोहून स्वत:ची कातडी
सोलवटली, कोपरंढोपरं फुटली, पण अजून कुणी सोबतीला भेटलं नाही, एखादी नावही दिसत नाही टप्प्यात कधी, काठावर जाण्यात
नाही अर्थ!       

स्वत:च्या पाचपाच
वर्षांमागच्या छब्या तयार करून रात्रीत पावसात उभ्या करून कल्पनेतच त्यांचे हावभाव बघून आलो. एकाहून एक
मुर्ख लेकाचे. स्वत्वाचा पत्ता नाही, स्वाभिमान सोयीस्कररित्या उफाळणारा, जगाची कल्पना नाही, जगण्याची आस नाही, हाती कौशल्य नाही, मनात कसली आग नाही. हे सगळं नाही तर नाहीच, पण मनाला स्थेर्यही नाही. वजनाने झुकलेल्या गाडीसारखी यांची मनं. आपण तारे
होऊन चमकलो नाही, निदान काळं आकाश व्हावं पोकळ नि अथांग, तर तसंही नाही! हे सर्वं घडलं आणि एवढ्या उशीरा जाणवलं. माणूस हा खरंच इतका मुर्ख प्राणी आहे का?

हसू येतंय
मला. खरंचभगदाड!!! कुणाकडे बोट दाखवावं की यांनी गंडवलं मला म्हणून? सरतेशेवटी आपणच आपल्या आयुष्यात मुर्ख ठरलो!
पंकज
२४ नोव्हेंबर २०१७, दौंड

गळ

गळआपण
ठरवतो त्या सर्व गोष्टी
आणि
सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा गोंधळ!
दिवसांमागून
दिवसांचा रेटा
जीव
घट्ट धरून बसलेला एकच एक गळ!
असे
किती गळ असतात प्रत्येक दिवसात
काही
क्षणांचे, तासांचे, आयुष्यभराचे!
एकेक
गळातून सुटका करतकरत
पुढच्या
गळांमधे मेंदूचे गर अडकवायचे!
खिडकीबाहेर
पक्षी चिवचिवतात, डोंगर खुणवतात
निराश
चप्पलीचे जोड, केविलवाणे जमिनीवर
विमान
उडतं एखादंदुसरं आकाशात
दररोज
विमानातली
लोकं बोटं दाखवून हसतात या गळांवर!
किबोर्डच्या पाठीवरच्या जखमा ओळखल्यात कुणी?
दगडाळलेल्या
बोटांच्या, ठेचलेल्या ह्रुद्याच्या संवेदना
मेंदूचे
बधीर पडलेले भाग, मनात गोठलेले
शब्द
अर्धवट
कविता नि कोऱ्या पानांच्या भावना?  
डोंगरातून
वाहणाऱ्या नदीला भविष्य असते का?
नदीत
आनंदात जगणाऱ्या माशांना असते का?
वनस्पतींच्या
तुकड्यांवर बसलेल्या चतुरांना?
या सर्वांमागे धावणाऱ्या माणसांनाअसते का?
घरी
परतणाऱ्या कावळ्यांना उद्याची भ्रांत नसते
वाहणाऱ्या
जीवघेण्या वादळाला पक्ष्यांची पर्वा नसते!
आपण
आपलं भविष्य बघत, पाय जपून
ठेवतो
तरी
पडतो चिखलात, खड़्ड्यात नि ठेच लागते
पडतो
तसे गळाला अडकलेले मेंदूचे गर ताणतात
त्रास
होतो, सुटका नसते; विमानं आकाशात उडतात
गाणी
गुणगुणत मग मलमपट्टी करतो आपण
आपल्याच
जखमांना, आपलेच लेप, आपणच बनवलेले
हे असं दररोज घडत असताना, तू इथं नसताना
तो एकच गळ, ज्यावर भाळलाय
जीव, बघताना
जीवाच्या
जखमांना प्रेमाचा गुलाबीसर रंग दिसतो
त्या
एका गळावर हा जखमी प्रवास चालत राहतो!

पंकज (पुणे, २६ ऑक्टोबर २०१७)

साद


गुंतलेल्या कोणातही
संग-ढंग न राहिला
शांत आणि भारदस्त
सागर एकट्याने पाहिला
आत व्यथा कोंडलेली
हात न पहुचे तिथे
भिती आत गोंदलेली
हाक जाई खोल जिथे
सारला पसारा,
व्यस्त कुणी मांडलेला
झुंजार झाला वारा,
अंग कापीत चालला
मी तरी शब्दांत ओतूनी
उगा झटकले मन
आत अजुनी बोलतात
तेच व्यथांचे कण
शांत आणि भारदस्त,
सागर एकट्याने पाहिला
जेव्हा खोल त्या खोलीत माणूस,
साद शोधत राहिला.
– पंकज

ऑक्टोबर २०१६

 

ही वाट दूर जाते…

सुर्य
कलत आलेला. आकाश सोनेरीसर होण्याच्या प्रयत्नात गुंग. दूरदूरपर्यंत
निर्मनुष्य समुद्रकिनारा. येणारेजाणारे
फक्त वारे. अस्पष्टसा समुद्री पक्ष्यांचा आवाज. वाऱ्यासकट
नागासारखी पळणारी वाळू. कोरडी ओलसर कोरडी दाट ओलसर वाळू नि तिच्यात
मऊसर उमटत जाणारी चार पावले. दोन पुढेपुढे
पळणारी राकट, भद्दड, अवाढव्य
नि असंतुलित. आणि दोन त्या पुढेपुढे
पळणाऱ्या पावलांच्या मागेमागे धावणारी चिमणी नि नाजूक. कुठे आलो काहीच पत्ता नसताना अचानक ती चिमणी पावले थांबतात काय आणि दूर तिकडे समुद्रात कुठल्याशा हालचालींना टिपतात काय निडॉल्फिनडॉल्फिन
म्हणत नाचतात काय! सगळाच अनपेक्षित कारभार. तिने
म्हणताच मी ही (हिसकावून) तिच्या
हातातली दुर्बिण घेत निरखतो. “अगं येडे! डॉल्फिन्स
आहेत ते!”

मग तेच तर सांगत होते तुला!” ती पुन्हा
सांगते.

मग
यापुढे सुर्य कितवर खाली आला याचं भान राहत नाही. आम्ही दोघे दूरवर दिसणाऱ्या पक्ष्यांच्या ठिपक्यांकडे पाहत पाहत जवळपास एक किलोमीटर
पुढे सरकतो. किती असावेत हे पक्षी? शंभरदोनशे. नाही! त्याहून जास्त. असतील जवळपास पाच हजार! पाच
हजार सिगल्स एकत्र! डेंजर आहे हे!
सुर्य
मग कलतो नि आम्ही दोघेही माकडचेष्टा करत ती एकुलती एक बाईक कुठे ठेवली ते शोधत जवळपास दोनेक किलोमीटर्सचा समुद्रकिनारा तुडवतो. त्या
तीनेक किलोमीटर्सच्या पट्ट्यात आजही तुम्ही गेलात तर तुम्हाला आमच्या दोघांची उनाड पावले नक्कीच सापडतील. फक्त तो कोणता
पट्टा, हे आता लक्षात नाही बुवा!

मग
बाईक सापडते नि गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या एका निमुळत्या गल्लीतून बाहेर पडतापडता एक घरकोंबडी
जिवाच्या आकांताने आमच्या बाईकपुढे पळत राहते. सहज गम्मत म्हणून म्हणतो, “काय
मुर्ख पक्षी आहे!”

अंधार
व्हायला अजून थोडा वेळ बाकी असतो. “मग कोणत्या
रस्त्याने जायचं सांग, सखे?”
ती कुठेतरी बोट करते, मी कुठेतरी
निघतो. उंचच उंच नारळाची झाडं, मधूनच मोठ्याने येणारी समुद्राची गाज,
मध्येच ती कानाशी गुणगुणत असलेलं गाणं, मध्येच मनात चालू असलेलं गाणं, मध्येच
मोठ्याल्या गाड्यांचे अप्पर्स, आणि मध्येच ही सुंदरशी
बाईक ट्रिप संपायला उरलेला इतकुसाच वेळ याचं मिश्रण कुठेतरी वेगळीकडेच पोहचवू पाहतं. त्या मिश्रणाच्या जाळ्यातून मनाची माशी सोडवायला आम्ही दोघेही फारसे उत्सुक नसतो; पण
पैसे कमवण्यासाठी घेतलेल्याजॉब
नावाच्या महामानवाच्या आमच्यासारख्या गुलामांसाठी ते मिश्रण घातक असतं. मनाची माशीच काय, गाढव, हत्ती, डायनासोरस
सुद्धा लीलया बाहेर काढण्याची हातोटी (किंवा सिध्दी) मागच्या
काही वर्षात प्राप्त केलेली असते. द्रुष्टचक्रात अडकलेली माणसं आपण.
पैसे कमवावेत आणि प्रवासावर उडवावेत. पुन्हा पुढच्या प्रवासासाठी पैसे कमवावेत, जमवावेत.
प्रवास संपत आला की परत आंबट तोंड नि लांबट चेहरा करून ऑफिस नावाच्या शाळेत कामाच्या पाट्या टाकाव्यात. हे सगळं
घडत राहतं नि आम्ही दोघेही थोडंसं त्या मिश्रणात अडकूनच बसतो. दोन नाहीतर पाच मिनीटं किंवा जास्तीत जास्त तासभर

आमच्या
या छोट्याशा बाईक ट्रिपची सुरूवात होते पुण्यापासून. साधी सोपी ट्रिप करावी. ती
म्हणते, “बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको”.
मी म्हणतो, “चिपळूणहून मार्लेश्वरकडे जाऊ.
रस्ता फार भारी नाही, पण चांदोली
अभयारण्याला लागून जातो. मागच्यावेळी मी घाटात
चार ढोल (जंगली कुत्रे) पाहिलेली,
शिवाय त्या शंकराच्या मंदिरात साप असतात आणि तिथे धबधबापण (म्हणजे
चतुरपण बघायला मिळतील!) आहे.”
पुढे काही कारणास्तव आम्ही मार्लेश्वरकडे जात नाही, पण पुढचा
प्रवास निवांत नि सुंदर होतो. खरं तर कोयनाचांदोलीमधे काही वर्षे काम केल्यामुळे या जंगलांच्या आठवणी कधीमधी स्वप्नात डोकावत असतात माझ्या, म्हणून
मला थोडी ओढ.

तर
आम्ही पुण्याहून निघतो. पुणे ते चिपळूण
हा पहिला टप्पा. त्यातली महत्त्वाची तीन आकर्षण स्थळेसंगमनगर
मधला बाईचा धक्का, कोयना गावातून दिसणारे कोयना धरण,
आणि माझ्या जिवाभावाचे पोफळीचे चिमुकले गाव आणि तिथल्या आठवणीआमची शाळा, पोहायला
जायचो (जिथे नंतर कधीतरी एक चिमुकली मगर सापडलेली) तो डोह, कुंभार्ली घाट, घाटातल्या करवंदाच्या जाळ्या, सोनपात्राचा
ओढा, महादेवाचं मंदिर नि तिथे निघालेली एक मोठी घोरपड (Monitor Lizard), आमचं MSEBचं घर नि घरामागचा आंबा, हिरवा पारवा (Emerald Dove), वाशिष्टी धरण,
पिराचा दर्गा नि पिराचा उरूस ..
स्थळं तीनच पण त्यांमागच्या गोष्टी तीन गुणिले अनंत. बाईच्या धक्क्यावरचा वडापावातला वडा एकदम वेगळा आहे.
जर जगभरातील वडे एकत्र केले तर बाईच्या धक्क्याच्या वड्यालाफिचर अवार्डमिळणारच
मिळणार! त्या माऊलीने कित्येक वर्षं अखंडपणे कितीतरी उपाशीतापाशी वाटसरूंना वडा चारून तारले आहे.
या वड्याला जितक्या उपमा देऊ तितक्या कमीच आहेत. त्या वड्याच्या आवरणात तुम्हाला अति चिमुकल्या पांढ़्ऱ्या टिकल्या दिसतील. या
पांढऱ्या टिकल्या म्हणजेच त्या वड्याचं असणंनसणं आहे.
काळ्या अवकाशात पांढऱ्या तारका असं म्हणून त्या वड्याची तुलना मी ब्रम्हांडाशी करण्याच्या प्रयत्नात असतानाच आमच्या सौं नीखसखसअसं
म्हणून माझी तंद्री भंग केलेली आता अंधुकसं आठवतं. तिथून पुढे तो अवाढव्य
कोयना डॅम बघून मी आतुरतेने कुंभार्लीचा घाट उतरत उतरत, तिला पोफळी दाखवतो. ती
म्हणते, “हे इतकंच?!” हो,
खरंच त्यावेळी मलाही कधीच पडलेला हा प्रश्न पडतो – “हे इतकंच?!” आम्ही दोघे जिथे उभे असतो, तिथून पुर्ण गाव एकत्रच नजरेस पडतं. आजकालची
गावं अशी सहजासहजी नजरेत मावणारी नसतात. माझं पुर्ण बालपण या छोट्याशा
गावात गेलं, पण आता
मलाही शहरांची सवय झालीय. खरंच काय करत असतील ही लोकं? मी पण पोफळीला चारेक वर्षांनी चक्कर मारली. म्हणजे एवढ्या कमी वेळात एवढा मोठा बदल होऊ शकतो आपल्या विचारांत? अवघड
आहे! ज्या गावाने मला पक्ष्यांच्या नि जंगलाच्या प्रेमात पाडले त्याबद्द्ल मी असा विचार कसा काय करू शकतो? काहीतरी बदललं आहेअसावं की नसावं? मी पुढचे
वीसेक किलोमीटर्स विचार करत राहतो. चिपळूण गाठतो तसा तो प्रश्नही
त्या चिमुकल्या गावासारखा जगाच्या कानाकोपऱ्यात विरघळून जातो


वाशिष्टी धरण बघून मी पुन्हापुन्हा स्वत:ला विचारतो – “हे इतकंच?!”
दुसऱ्या
दिवशी सकाळी मार्लेश्वराकडे जाण्याऐवजी आम्ही हेदवीच्या दिशेने कूच करतो. काय तो सुंदर
रस्ता! बाईक चालवण्यासाठी एकदम योग्य. अगदी तुरळक वाहतूक. हिवाळ्याचे
दिवस आणि ते दोन सुंदर रंगआकाशाचा निळा नि गवताचा
पिवळा. आम्हीही रमत गमत जात राहतो. मधे कुठे गवताचं रान दिसतं तिथे निवांत झोपून फोटो काढतो. एक
मोठ्ठा तलाव दिसतो, त्यात मगरी असतात, शिवाय
एका वीजेच्या खांबावर तिरंदाज (Oriental Darter) बसलेला दिसतो. मधे दोन
(Oriental Honey Buzzard)
दिसतात
तर त्यांचा मागोवा घेत जातो. आणि मधे एक शांत
सुंदर झरा दिसतो. गाडी आपोआप थांबते नि पावले
त्या नितळ पाण्याकडे वळतात. कुठून जन्मला माहिती नाही, पण
त्या स्वच्छ झऱ्याकडे नि आजूबाजूच्या दाट झाडीकडे पाहून वाटत की आज एक ना एक तरी सुंदर टाचणी (Damselfly) दिसणारच!
पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ (endemic) टाचणी. मी दुर्बिण घेऊन झऱ्याकाठी जातो. “कोणकोण आहे बरं? हात वरती करा!”
मलबारी परी (Malabar Torrent Dart) की कुर्गची
कुडी (Coorg Bambootail) आहे?” तेवढ्यात दोन भरजरी निळ्या टाचण्या उडतउडत एका वाळक्या काडीवर येऊन बसतात. मी दुर्बिणीतून
बघताच, हसतात. पिवळ्या पाठीच्या निळ्या राण्या (Yellow-striped Blue Dart). “हो! हो!
तुम्हीपण!” हो! हो!
यापण पश्चिम घाटातल्या प्रदेशनिष्ठ जाती. काय ते गुण
गावेत आपल्या पश्चिम घाटाचे. एवढ्या दूरवर आलो आणि यांचे दर्शन झाले म्हणजे मार्लेश्वरला शंकराचं दर्शन घ्यायला किंवा हेदवीला गणपती मंदिरात जाण्याची काही गरज नाही. मी
इकडे टाचण्यांबरोबर गप्पा मारत असतो तर तिकडे ती आजूबाजूला कुठे साप नाही ना, प्राणी नाही ना याची
खात्री करत असते.

दोन निळ्या टाचण्या उडतउडत एका वाळक्या काडीवर येऊन बसतातदुर्बिणीतून बघताच, हसतात.

मग
आम्ही हेदवीला पोहोचतो. आम्ही बामणघळ बघतो, अनुभवतो.
तिथून आम्ही हेदवीच्या काताळावर येतो आणि तिथल्या भन्नाट वाऱ्यात स्वत: हरवून
जातो. ऊन थोडंसं लागल्यावर आम्ही वेळणेश्वराच्या किनाऱ्याला पोहोचतो. तिथल्या दिसता क्षणीच प्रेमात पडायला लावणाऱ्या रिसॉर्ट्मधे आमचं बस्तान मांडतो. दिवसभराचा
प्रवास, पण खोलीसमोर समुद्र! डोळे थोडे खालावलेले, पण
खोलीसमोर समुद्र! अशावेळी आमच्यासारख्या गुलामांनी काय करावे? तेच
करावे जे सारे करतात. संध्याकाळी आम्ही समुद्रात खेळतो नि रात्री
सुरमईचं जेवण करून त्या शांत किनारी एका चटईवर आकाश बघत पडतो. वाट्तं ही शांत
वेळ अशी कुणालाही साध्य होत नाही. त्याच्यासाठी झगडावं लागतं. आम्ही
दोघेही मग कधी सुचलेल्या गप्पा मारत बसतो. तेवढ्यात आमच्या शेजारच्या खोलीवर राहणारं एक फिरंगी
जोडपं किनाऱ्यावर येतं. काही बोलता
ती मुलगी भराभर कपडे उतरवून (मोजके अंगावर राखून मात्र) दूर
कुठेतरी समुद्रात शिरते. काळ्या समुद्रात ती गोरी
असल्यामुळे कुठेतरी वरखाली होताना तेवढी दिसते. मग
आम्ही दोघेही विचार करतो की आपण असं करायचं का? पण रंगात
आम्ही मार खातो!

वेळणेश्वर
सोडून दुसऱ्या दिवशी आम्ही गुहागरला पोहोचतो आणि मग कितीतरी कुठल्याकुठल्या गल्ल्या फिरून त्या डॉल्फिन्सच्या किनाऱ्यावर अवतरतो. हळूहळू
जाणवतं की या मिश्रणात आमच्यासारखेच अनेक जीवजंतू अडकून पडलेत. निसर्गाचं,
समुद्राचं, जंगलांचं नि रस्त्यांचं आकर्षण हे कमी होणाऱ्यातलं नाही. मनाचा ठिय्या करून मी हिला
म्हणतो, “सोडायचे आता सगळे मोह. तडक पहाटे उठायचं नि पुण्याला
निघायचं. कुठे थांबायचं नाही.” ती बिचारी
निमूटहोम्हणते.

पहाटे
अंधारातच चाचपडत गाडी काढतो, तीवर बॅग कच्चून बांधतो. निघतो. गुहागर गावाबाहेर पडताच अंधार गडदसा वाटू लागतो. गाडीचा प्रकाश अगदीच मलूल वाटतो. तेवढ्यात
एक खोकड (Jackal) रस्ता ओलांडताना गाडीसमोरच येते. दोनपाच सेकंद आमची नजरानजर होते नि मग पुढचा रस्ता अजूनच खुणावू लागतो. एका लांबड्या रस्त्याला किती वाटा, फाटेकाय असेल या फाट्यांवरती? कसे कळणार? गेल्याशिवाय
कळणार नाही. मिश्रणातली मनाची माशी उडून बाहेर येण्याऐवजी डॉल्फिन्ससारखी आत आत
गेल्याचे पुण्याला पोहोचल्यावर जाणवते. मग ती
म्हणते, ही वाट दूर जाते, माघारी फिरते.”
ही वाट दूर जातेमाघारी  फिरते.

– पंकज कोपर्डे
First appeared in Snehadeep July 2017

Identity Crisis

मग मी शांत चित्ताने
विचार करायचा असं ठरवतो. ‘कोण आपण? कसे आपण?’ प्रश्न फार साधे सोपे, पण उत्तरं
शोधणं किती कठीण. कुठून सुरूवात करायची तेच कळेनासं होतं. एकेक प्रश्न सोडवणं योग्य
म्हणून पहिला प्रश्न पहिल्यांदा – ‘कोण आपण?’ या प्रश्नात ‘आपण’ हे आदरार्थी एकवचन
आहे, हे ध्यानात येऊ दे म्हणजे अजूनच सोप्पं.

‘कोण आपण?’

साहजिक येणारं उत्तर
म्हणजे – पंकज कोपर्डॆ. मग मनाला लाज वाटते नि वाटतं की एवढा कोता विचार?

पुढचं लगेचंच येणार
उत्तर म्हणजे – मनुष्य. मग मनात अजून थोडी शंकेची पाल चुकचुकते.
त्यापुढे वाटतं – नुस्तं
मनुष्य नाही, तर मनुष्य-प्राणी. मग वाटू लागतं की हे इथे काही संपत नाही. का स्वत:ला
मानवानेच तयार केलेली जात-व्यवस्था लावायची?

थोडा वेळ विचार केल्यावर
वाटतं की ‘जीवजंतू’ म्हणावं की ‘सजीव’ म्हणावं, मग निर्जीवांना जीव नाही ही सुद्धा
एक कल्पना, म्हणून ते ही बरोबर नाही. या अंतराळात फिरणाऱ्या अनंत भागांपैकी एक भाग.
मग पुढे वाटतं की ही व्याख्या साऱ्यांनाच लागू होते की. डुक्कर, गाढव, जीवाणू, विषाणू
सर्वांनाच. मग मी नि ते वेगळे कसे? ‘कोण आपण?’समजतं की या प्रश्नाला
अनंत थर आहेत. कोणत्या थरात शिरल्यावर मनाला बरं वाटेल त्यावर लक्ष केंद्रित केलं तरच
पुढच्या प्रश्नाचं सोयिस्कर उत्तर शोधता येईल. या विचारासरशी मन पहिला थरावरच समाधान
मानतं. बरं, ‘कोण आपण?’ तर पंकज कोपर्डे. मग कशावरून आम्हीच पंकज कोपर्डे? मग स्वत:भोवतीची
वलयं जाणवू लागतात. मी तोच कारण तो लिहीतो नि मी पण लिहीतोय; त्याची एक वेगळीच शैली
आहे लिहण्याची, माझीही तीच आहे; तो पक्षी-निरीक्षक आहे, मी ही आहे; तो असा आहे, मी
ही तसा आहे; त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडेही तेच आहे; त्याचे विचार-वागणं-बोलणं सगळं
माझ्यासारखंच आहे; तो नि मी आम्ही वेगळे नाही आहोत…फोटो बघता का? की अंगठ्याचा निशाणा?
पेक्षा जनुकीय चाचणीच सांगेल सगळं. मग मेंदू म्हणतो एका काल्पनिक नावाबरोबर जनुकीय
चाचणी कशी काय शक्य आहे बाळा? मग शासकीय कागदपत्रं आहेत माझ्याकडे – आधार कार्ड, पासपोर्ट,
पॅन कार्ड अजून काय हवं. मग मेंदू म्हणतो पण तुला पंकज कोपर्डे होण्याचं एवढं आकर्षण
का आहे? तू तर शाहरूख खानसुद्धा होऊ शकतोस किंवा दिया मिर्झाही होऊ शकतोस! कल्लोळ माजतो
तसा तो प्रश्न कुठेतरी लुप्त पावतो. मग पुढचा दुसरा प्रश्न –
‘कसे आपण?’


पहिला प्रश्न सोडवण्यासाठी
जो पसारा मांडला त्यातल्याच ओळी या उत्तरासाठी हमखास वापरल्या जाणार. पण इतरांना आपण
कसे वाटतो? याचा विचार प्रबळ होऊ लागतो. इतरांना आपण कसे वाटतो हे खरंच सांगणं किती
अवघड आहे. कसेही वाटत असू! त्यांच्या-त्यांच्या कुवतीप्रमाणे आपल्याला पारखत असतील
लोक. असतील तर असतील, पण मग आपल्याला स्वत:ला आपल्या आयुष्याबद्दल काय वाटतंय? चांगलं
की वाईट की काहीच नाही? हे सुद्धा काळाप्रमाणे बदलणार, पण तरीही. ठीक वाटतंय किंवा
काहीच नाही किंवा काय माहिती. कधी असा विचार केलाच नाही. असं असेल तर मग त्या दुसऱ्या
प्रश्नाच्या पण ठिकऱ्या उडाल्या.

मग आता, प्रश्न सुटले
की गुंता उरला तसाच? असेल, नसेल, कुणाला काय; गायीच्या शेणात भरलाऩ पाय; घरी गेल्यावर
कावेल माय!  
पंकज कोपर्डे
(कोण?)

१७ जून २०१७

पिंगळवेळ

घुबडम्हटलं
की आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर भितीची छटा उमटलेली दिसते. ‘घुबडहा विषयच तसा आहे. घुबडाच्या
रात्रींचर स्वभावामुळे घुबडाविषयी आपल्यांत गैरसमजुती फार आहेत. शिवाय
आपण मिडियामधे उदाहरणार्थ चित्रपटांमधे घुबडांचे चित्रीकरण हे भितीदायक सिनेमांमधे केल्याचे सतत पाहतोच

Barn Owl – Photo by Varun Vaze
खरे
तर घुबड हे नैसर्गिक उत्क्रांतीचे एक उत्तम उदाहरण आहे. मोठे
डोळे, गोलपसरट तोंड, आणि आवाज करता उडण्याची क्षमता ही घुबडाची काही ठळक वैशिष्ट्ये. अजून एक गोष्ट तुम्हाला माहिती नसेल कदाचित ती म्हणजे घुबड मान २७० अंशामधे वळवू शकते. अशी
ही मान आपण जर वळवायला गेलो तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम काय होतील हे सांगायलाच नको, पण
मग घुबडाला हे कसे शक्य होते बरं? याचं
उत्तर ऐकल्यावर तुम्हाला खरंच खात्री पटेल निसर्गाच्या किमयेची! घुबड
हे एके ठिकाणी बसून भक्ष्यावर पाळत ठेवून असते. भक्ष्य
नजरेच्या टप्प्यात रहावे म्हणून घुबड फक्त मान वळवून भक्ष्यावर लक्ष ठेवते. अशा
जीवघेण्या कोनात मान वळवणे इतर प्राण्यांना शक्य होत नाही, कारण
असे केल्यास हाडं तुटण्याची भिती तर असतेच पण मुख्यत्वे रक्तवाहिन्या फुटण्याची शक्यता असते. लाखो
वर्षांच्या उत्क्रांतीमधून घुबडाच्या शरीरात अशी सोय आहे की मान वळवताना रक्तवाहिन्या फुटणार नाहीत. घुबडाच्या
मान वळवण्याने ज्याज्या
वेळी महत्त्वाच्या रक्तवाहिन्या बंद होतात, तेव्हा
काही राखीव रक्तवाहिन्या रक्त पुरवठा करत राहतात. शिवाय
घुबडांना मानेत मनुष्यापेक्षा जास्त मणके आणि छोटी हाडे असल्यामुळे ही मान वळवण्याची प्रक्रिया त्यांना सोपी जाते. त्यामुळे
आपल्याला जरी शक्य नसले तरी घुबडांना ही मान वळवण्याची कला आता चांगलीच अवगत झाली आहे.

Indian Scops Owl – Photo by Sudhir Garg
तसे
पाहता घुबडांना वेगवेगळ्या संस्कृतींमधे मोलाचे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे
हा पक्षी एवढा भितीदायक कसा, असा
प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. घुबडाचा
आकार आणि चेहरा हा इतर पक्ष्यांपेक्षा वेगळा असल्यामुळेही घुबडाविषयीच्या अंधश्रद्धांवर आपला लगेच विश्वास बसत असेल; पण
खरे पाहता इतर कोणत्याही पक्ष्यासारखा घुबड हा एक सर्वसाधारण पक्षी आहे. हिंदू
संस्कृतीमधे घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते, असे
असताना हा एवढा सुंदर पक्षी भयानक कसा काय असू शकतो? पुरातन
ग्रीक संस्कृतीमधे अथिना नावाची एक देवी होती. ही
देवी जगाच्या उद्धारासाठी, भरभराटीसाठी काम करत होती. या
देवीचा आवडता पक्षी कोणता असेल बरं? अथिनाचा
आवडता पक्षी, जो
तिच्या सर्व मुर्त्यांमधे नि चित्रांमधे आढळून येतो तो म्हणजे हिमालयात नि युरोपात आढळून येणारे लिटल आऊल. ‘अथिनाचे भक्त या युरोपिअन पिंगळ्यालाचअथिनामानतात
पिंगळा हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल. पहाटे
जो येतो दारात नि भरभराटीचे वरदान देतो, देवाचे
नामस्मरण करत तो सुद्धापिंगळाआणि तुमच्या घराशेजारच्या आंब्यावर, वडावर
किंवा पिंपळावर बसून किच्अ किच्अ किच अशा आवाजात ओरडतं ते स्पॉटेड आऊलेट म्हणजेहीपिंगळा. घुबडांशी
जर आपली पुरातन काळापासून एवढी घट़ट ओळख आहे तर मग त्यांची भिती वाटण्याचे काहीच कारण नाही. त्यांच्याविषयी
अंधश्रद्धा बाळगण्याचेही काही कारण नाही.

Jungle Owlet – Photo by Aman Gujar
निसर्गामधील
अन्नसाखळीमधे घुबड मोलाचे काम करते. घुबड
उंदीर, सरीसृप, किडेकीटक
इत्यादी प्राणी खाते. प्रत्येक
शेतामधे तुम्हाला एकतरी पिंगळ्याची (स्पॉटेड आऊलेट), जंगली
पिंगळ्याची (जंगल आऊलेट) किंवा
गव्हाणी घुबडाची (बार्न आऊल) जोडी
सापडणारच. जिथे
शेत तिथे उंदीर, म्हणजेच
घुबडाचे खाद्य.

जगभरात
जवळपास २०० जातींची घुबडे सापडतात. भारतात
३३ जातींची घुबडे आढळून येतात. पैकी
जवळपास १६ जाती आकाराने कावळा किंवा त्याहून मोठ्या आकाराच्या आहेत आणि राहिलेल्या त्याहून छोट्या आकाराच्या. मजेशीर
गोष्ट अशी की सर्वच घुबड समाज रात्री कार्यरत नसतो. मध्यभारतात आढळणारा रान पिंगळा (फॉरेस्ट
आऊलेट) हा बऱ्याचदा सकाळी भक्ष्य मिळवताना आढळून आलेला आहे. रान
पिंगळा हे प्रदेशनिष्ठ घुबड असून ते फक्त मध्यभारत
आणि पश्चिम घाटाच्या उत्तरेला आढळून येते. रान
पिंगळ्याची गोष्ट फार न्यारी आहे. १८७२
साली जगविख्यात ऍलन ह्युम या पक्षीसंशोधकाने
रान पिंगळ्याचा शोध लावला. १८७८
सालापर्यंत रान पिंगळ्याची काही निरीक्षणं संशोधकांनी घेतली, मात्र
१८७८ सालानंतर पुढची ११३ वर्षे रान पिंगळा कुठेच आढळून आला नाही. या
बाबीची नोंद घेताना काही संशोधकांना वाटले की रान पिंगळा नामशेष झाला की काय; पण
१९९७ साली जगविख्यात पक्षीसंशोधक
पामेला रासमुसेन आणि बेन किंग यांनी नंदुरबार जिल्ह्यात रान पिंगळा पाहिला. तेव्हापासून
आजवर बऱ्याच भारतीय संशोधकांनी मध्य भारतातल्या अगणित ठिकाणी सर्वेक्षण करून रान पिंगळ्याच्या सद्यपरिस्थितीवर् प्रकाश टाकला आहे.

Forest Owlet – Photo by Aman Gujar
पश्चिम
घाटाच्या दृष्टीने घुबडांवर काम करणे अत्यावश्यक आहे. सिंधुदुर्ग
आणि इतर पश्चिम घाटात घुबडांच्या वेगवेगळ्या जातींसाठीचा अधिवास उपल्ब्ध आहे. रात्री
फक्त घुबडेच बाहेर पडत नाहीत, तर
रातवे (नाईट
जार) आणि बेडूक तोंड्या (सिलोन
फ्रॉगमाऊथ) ही बाहेर पडतात. बेडूक
तोंड्यासारखा पक्षी बघण्यासाठी भाग्य तर लागतेच पण त्याहून जास्त महत्त्वाचे म्हणजे सदाहरित वनांचे आच्छादन असणे फार गरजेचे आहे. रान
पिंगळ्यासाठी सागाचे वन हवे तर जंगली पिंगळ्यासाठी सदाहरित आणि आर्द्र पानगळीचे वन हवे. मासेमार
घुबड (ब्राऊन
फिश
आउल) पहायचे असेल तर जंगलातील ओढे नि नद्या स्वच्छ नि प्रदुषण विरहित ह्व्यात. हे
आणि असे सर्वच पक्षी आज अधिवास हरवल्यामुळे धोक्यात आलेले आहेत. सततची
वनकटाई, मोठ्या प्रमाणावर नामशेष होणारा घुबडांचा अधिवास आणि मानवी कृत्यांमुळे दुषित होत चाललेले गोड्या पाण्याचे स्त्रोत घुबडांच्या नाशाला कारणीभूत आहेत.

Brown Hawk Owl – Photo by Dhruv Phadke
घुबडे
नसतील तर उंदरांची आणि शेतीची नासधुस करणाऱ्या कीटकांची संख्या तर वाढेलच पण घुबडांमुळे नैसर्गिक परिसंस्थेला मिळणारे पौष्टिक घटक मिळणे बंद होईल. यावरती
घुबड आजच्या परिंसंस्थेत नसतील तर त्याचे दुरगामी परिणाम काय असतील हे सांगणे कठीण असले तरी त्यांच्या नसण्याने परिसंस्थेचे आरोग्य दिवसेंदिवस खराबच होत जाईल, हे
सांगणे कठिण नाही.

घुबडांच्या
आवाजात आणि त्यांच्या उडण्यात जी नजाकत आहे ती शब्दांत सांगणे कठीण असले तरी जेव्हा तुम्ही ती अनुभवाल तेव्हा तुम्हाला घुबडांविषयी अजूनच आत्मीयता वाटू लागेल. जंगल
आणि पाणी संवर्धन केले तरच घुबडांचे संवर्धन शक्य आहे. ही
केवळ
घुबडांची
नाही, पण आपल्या सर्वांचीच ती गरज आहे. ‘अथिनाआणिलक्ष्मीच्या वाहनास वाचवण्याची मोठी जबाबदारीपिंगळाआपल्यावर सोपवून गेला आहे! 

पश्चिम
घाटात
आढळून
येणारी
काही
घुबडे
. गव्हाणी घुबड (Barn Owl)
. गवती घुबड (Eastern Grass Owl)
. कंठेरी शिंगळा घुबड (Indian Scops Owl)
. प्राच्य शिंगळा घुबड (Oriental Scops Owl)
. जंगली पिंगळा (Jungle Owlet)
. पिंगळा / ठिपकेवाला
पिंगळा (Spotted Owlet)
. रान पिंगळा (Forest Owlet)
. हुमा घुबड (Eurasian Eagle-Owl)
. वन हुमा घुबड (Spot-bellied Eagle-Owl)
१०. मासेमार घुबड (Brown Fish-Owl)
११. चट्टेरी वन घुबड (Mottled Wood-Owl)
१२. बहिरी घुबड (Brown Hawk-Owl)
पश्चिम
घाटात
आढळून
येणारे
इतर रात्रींचर पक्षी
. बेडूक तोंड्या (Ceylon Frogmouth)
. रान रातवा (Jungle Nightjar)
. जर्डनचा रातवा (Jerdon’s Nightjar)
. फ्रॅंकलीनचा रातवा (Savanna/Franklin’s Nightjar)

. सामान्य रातवा (Indian Little Nightjar)

Reproduced from and extended version of 
Page 01, Date – 30 May 2017

केव्हा तरी पहाटे

आताशा
संध्याकाळची वेळ होते तशी कोमट झुळूक कुठूनशी येते. दुपारी बारा वाजेपासून संध्याकाळी सहापर्यंततरी तापमान चाळीशीच्या उंबरठ्यावर पुढेमागे
झुलत राहिलेले असते. दुपारच्या गरम झळा कंटाळल्यासारख्या माघारी फिरतात संध्याकाळी नि मग
कोमट झुळूक वाहत राहते. दुपारी आटलेली नदीकाठची टिटवी अचानकच जागी होते. दिवसभराचं
राहिलेलं सगळं ओरडायला सुरूवात करते. रस्त्यावरची वाहतूक थोडी भरल्यासारखी वाटते आणि ट्राफिक सिग्नल्सवरती गाड्यांची गर्दी पाहून जीवन सुरळीत चाललंय याची हमी भेटते.

उन्हाळा
सुरू झालाय आता महाराष्ट्रात. तापमान कुठे अधिक कुठे अतिअधिक असंच चाललंय. त्यात नविन ते काय? उन्हाळ्याचा उत्सवच असा. उष्माघाताचे बळी ठरलेलेच मुळी. घामाच्या
धारांनी हैराण करून सोडलेलं असतानाही दिवसभर एकाच जागी खपणारे सरकारी किंवा बिगरसरकारी कर्मचारी आणि घरी परतल्यावरही घामाच्या बिछान्यात लोळणारे हे जीव. भारतातल्या कार्यालयांची परिस्थिती इतकीही चांगली नाही की घाम येणारच नाही. तो येणारच,
पण त्याला कितपत समजून घेणारी लोकं आजूबाजूला आहेत त्यावर घाम आला म्हणून लाजायचं की नाही हे ठरवावं लागतं. निसर्गानं आपल्या स्वत:च्या
शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी आखलेली ही योजना आपण कित्येकदाअनप्रोफ़ेशनल दिसतंया भावनेने
दुर्लक्षित केली, करत राहतो. घामाचा
वास मारतो म्हणून आपण डिओडरण्टचे फवाऱ्यांवर फवारे मारत राहतो. एवढं सगळं करूनही जेव्हा तापमान चाळीशी ओलांडतं तेव्हा घामांच्या धारांवर काहीच उपाय चालत नाही. माणसानं
काम करावं का घाम पुसत रहावा नि डिओ फवारत रहावा?

घामाच्या
धारा हा तसा फार खोल विषय आहे. त्यावर बोलत बसलं तर
स्नेहदीपचा एखादा अंकही अपुरा पडेल. मी विषय
काढला कारण कुणी यावर जास्त चर्चा करत नाही आणि या प्रश्नाला लोक सततवैयक्तिकस्वरूप
देऊन टाळतात. घाम हा वैयक्तिकप्रश्न जसा उन्हाळ्यात उदभवण्याची शक्यता असते, तसेच
अनेकविध प्रश्न उन्हाळा आपल्यासमोर घेऊन येत असतोदरवर्षीच. आपण
आपल्याच व्यापात गुंडाळलेले (किंवा गुंडाळवलेले!) लोक आपल्यावैयक्तिक
प्रश्नांपुरतेच मर्यादित राहतो. आपल्या प्रश्नांची झेप कित्येकदाउद्या
पाणी येणार नाही तर आता भरून ठेऊइतपर्यंत जातेही, पण
त्यापुढे जाऊन सरकारला दोष देणं, हवामान बदलाला दोष देणं इथं कुठंतरी येऊन गाडी थांबते. संध्याकाळची
रस्त्यावरची ट्राफिक बघितली की आपल्या जिवात जीव येतो. आपण मनातल्या मनात म्हणतो की
दुपारपेक्षा आता बरं आहेआणि रात्री बिछान्यावर दोनेक वाजेपर्यंत अस्वस्थ लोळत पडतो, कारण
त्रास होत असतो. झोप लागत नाही, मानेखाली
सतत घाम चिखलासारखा भासत राहतो; कूलर असलाच तर त्याची
दमट हवा नाकाकानांत जाऊन नाक चोंदते. रात्री
एक किंवा दोन नंतर आपण उठतो, थोडं इकडेतिकडे
करतो. आरशात डोळ्यांतल्या रक्तवाहिन्या चांगल्याच गलेलठ्ठ दिसतात, तोंडावर पाणी मारून पुन्हा आपण लोळण घेतो. दिवसभराच्या
कामाच्या ताणाने ताणलेला आत्मा थोडा सैलसर पडतो. रात्र आता थंडेरी झुळूक सोडू लागते आणि केव्हातरी पहाटे डोळा लागतो.  
झोपेचे
काही तासच मिळतात पहाटेच्या वेळेस आणि काही तासांतच गोंधळगडबड कूलरच्या आवाजाहूनही वाढतो. जाग
येते तसं समजतं की पाणी आलंय नि जोतो जगण्याच्या
धावपळीत गुंतलेला आढळतो. हे सगळं
बघून वाटू लागतं हे
काय जगणंय?’

बरं, हे नको; मग कसं जगणं हवंय तुम्हाला?’ हा प्रश्न
खरं तर आपल्याला नाही पडत, पण उन्हाळा
हा प्रश्न दररोज विचारत राहतो, एवढंच की कुणी
लक्षच देत नाही बिचाऱ्याकडे. उन्हाळ्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन किती कोता आहे याची जाणीव मला पदोपदी होत राहते, पण
आपण नळाला आलेल्या पाण्याने समाधानी होण्यावरच अडकलोय ही खेदाची बाब आहे.

उन्हाळा दरवर्षी हेच विचारतो – “Is this what you
want?”

घामाची
पर्वा करता कुण्या अनोळख्या व्यक्तींसाठी पाण्याची सोय करणारे कित्येक राबणारे हात महाराष्ट्रात आज काम करताहेत. त्यांचं काम प्रशंसनीय आहे,
त्यात शंकाच नाही. हे लोक, पाणी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन, आणि
असे कित्येक, आज जी
पाण्याची कमतरता जाणवतीय ती भरून काढण्यासाठी अतिशय तळमळीने काम करताहेत. गावकऱ्यांच्या जागृतीचं काम करत,
त्यांच्या खांद्याला खांदा लावूनपाणी अडवा, पाणी जिरवाचा घोष
करत ही मंडळी उन्हाळ्याला त्यांच्या परीने उत्तर देत आहेत आणि दुसरीकडे आपल्यासारखे ते च्या नोकरीत अडकलेले आणि संसाराच्या व्यापात गुंगलेले जीवआज नळाला
पाणी येतंय की नाहीया प्रश्नावर
गुंजन करत राहिलेत. याव्यतिरिक्तही आजच्या घडीला जुनाट झालेले सणउत्सव साजरे करून उन्हाळ्याची थट्टा आपण चालूच ठेवलीय. अगोदर जंगलं जाळून मनातल्या दु:इच्छांचं दहण करायचं, नंतर पाण्याची रंगपंचमी खेळून आपल्या मनातलाजगाचे
आम्ही राजेअसा सुप्त अहंकार जागृत करायचा. हे
दरवर्षीचं आहेच. दिवाळीत फटाके फोडून स्वत:च्या
आजूबाजूचं वातावरण दुषित करायचं नि ‘Smoking Kills’ च्या
जाहिराती करत फिरायचं.

उन्हाळा
दरवर्षी, दररोज हाच एक प्रश्न माझ्यासमोर उभा करत येतो. “Is this what you want? हे असं जगणं तुम्हाला हवंय का? तुम्हाला तुमच्या आजूबाजूला नैसर्गिक हिरवळ, झाडं नको आहेत का? तुमच्या आजूबाजूचे स्वच्छ पाण्याचे साठे तुम्हाला मारून टाकायचे आहेत का? तुम्हाला हवामान बदलाला अजून हातभार लावायचा आहे का? तुमच्या पाणी नि वीज तुटवड्यात तुम्हाला भर टाकायची आहे का?

उन्हाळ्याचे
हे सारे प्रश्न आजचे नाहीत. हे माणूस
जेव्हा जग जिंकण्याएवढा समजूतदार झाला तेव्हाचे आहेत. जगातला सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून जगाविषयी आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत. जरी
या जबाबदाऱ्या तुम्ही झटकल्या तरी स्वत:च्या नि स्वत:च्या पुढच्या पिढीच्या जगण्यासाठी काही गोष्टी करणं अतीव गरजेचं आहे. आजचे भारताचे प्रश्न उद्या जाऊन जगाचे प्रश्न बनणार आहेत कारण जीवन आणि जल सर्वत्र
आहे. आपल्याला मिळालेली बुद्धी, ताकद, मुबलक
प्रमाणात उपल्ब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती आपण गमावली तर आपल्याएवढा
दु:खी जीव या जगात कुणी नसेल.

उन्हाळा
चिडचिडीचा, त्रासाचा नाहीये. तो आपण
करून बसलोय आता. जंगलात फिरताना उन्हाळ्याची कितीतरी साजरी रूपं पाहिली आहेत मी.
हिवाळ्यासारखाच उन्हाळाही आल्हाददायक सण आहे. पिवळट झालेल्या शुष्क पानगळीच्या वनात फुललेली लालभडक पळस (Butea
monosperma
)
बघितलीय
का तुम्ही कधी? `Flame of the Forest’ म्हणतात तिला. आता ही गुलाबीसर
लाल पळस आपला नैसर्गिक जलवा दाखवत असताना वणव्यांची नि होळीची काय गरज आहे? त्या पळसेवरती चरणारे विविध जातींचे पक्षी बघूनहे
resource utilization
आपण
करू शकलो नाहीया विचाराला
वाचा तरी फुटेल; आगीभोवती नुसतंच बोंबा मारत फिरण्यात काय तथ्य आहे?

उन्हाळयाने जन्मच नाही घेतला तर पिवळं झुलदार गवत कसं अनुभवणार तुम्ही?

मध्यभारताच्या तळपत्या उन्हात फिरलात तर सकाळच्या वेळेस एक मंद हवाहवासा वाटणारा गंध वेडावून जाईल तुम्हाला. मोहाच्या प्रचंड झाडांच्या फुलांचा हा गंध, उन्हाळ्याव्यतिरिक्त कधी सापडणार? अगदीच नशिबवान असाल तर मोहाची
(Madhuca longifolia) फुलं खाऊन झिंगलेलं एखादं वानरही दिसेल आसपास. उन्हाळ्याव्यतिरिक्त कधी तुम्हाला फळांचा राजा चाखता येणार? उन्हाळयाने
जन्मच नाही घेतला तर पिवळं झुलदार गवत कसं अनुभवणार तुम्ही? पळस नि मोह
सोडा, नुस्ता बहरलेला बहावा (Cassia fistula) जरी तुम्ही बघितलात तर रंगपंचमी खेळल्याबद्दल तुमची तुम्हालाच लाज वाटेल. उन्हाळ्यानं रंगपंचमी वर्षानुवर्षांच्या उत्क्रांतीने आपल्या अगोदरच सुरू केली आहे.
उगाच नाही बहाव्याला ‘Golden Shower Tree’ म्हणत. नीलमोहोर
(Jacaranda mimosifolia)
पाहिलाय
कधी? हे माझ्या जिव्हाळ्याचं झाड. त्या नीलमोहोराच्या सड्यावर कित्येक तळवे उदार झालेत आजवर! जर
उन्हाळ्याचा हा आफ्रिकन, but very much Indian, अविष्कार तुम्ही पाहिला नसेल तर पुणेरी भाषेत बोलायचं <